सामाजिक बांधिलकीतून 46 क्षयरुग्णांना घेतले दत्तक


सामाजिक बांधिलकीतून 46 क्षयरुग्णांना घेतले दत्तक

         वाशिम, दि. 12 (जिमाका) : रिसोड येथे आज 12 एप्रिल रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बेले यांच्या उपस्थितीत स्वर्गीय शिवलालजी झवर स्मृती प्रित्यर्थ झवर परीवाराच्या वतीने 22 क्षयरुग्णांना प्रोटीन पावडर व धान्य कोरडा पोषण आहार देण्यात आला. स्वर्गीय गीताबाई शंकरलालजी साबू यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. रमेशचंद्र साबू यांच्याकडून 22 क्षय रुग्णांना प्रोटीन पावडर व धान्य कोरडा पोषण आहार देण्यात आला तसेच रिसोड येथील वरीष्ठ उपचार परिवेक्षक प्रमोद बावणे यांच्याकडून 2 क्षय रुग्णांना प्रोटीन पावडर व धान्य कोरडा पोषण आहार देण्यात आला.  

            क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य हा आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालायचा एक प्रमुख उपक्रम आहे. ज्याद्वारे, क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळते. यासाठी समाजातील विविध भागधारक सहकारी कॉर्पोरेट, निवडून आलेले लोकप्रतिनिधी, वैयक्तिक संस्था, व्यक्तिशः व दानशूर व्यक्ती क्षयरुग्णांना सहाय्य देऊन मदत करून आपण निक्षय मित्र बनू शकतात.

             राष्ट्रपतींनी 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान सुरू केले आहे. यामध्ये निक्षय मित्र बनवून त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना कमीत कमी 6 महिने कोरडा आहार पुरविण्यात येतो.  जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींना याव्दारे आवाहन करुन त्यांनी निक्षय मित्र बनून आपला जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.

                                                                                                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश