पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दृष्टीक्षेप -२०३० पुस्तिकेचे प्रकाशन
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते
दृष्टीक्षेप -२०३० पुस्तिकेचे प्रकाशन
वाशिम दि.८(जिमाका) समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील अनुसूचित जाती, दुर्बल व वंचीत घटकांसाठी निश्चित केलेल्या केलेल्या उद्दिष्टांप्रमाणे प्रभावीपणे सन २०३० पर्यंत मिळावा.यासाठी नियोजनावर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या दृष्टीक्षेप - २०३० या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ७ एप्रिल रोजी यवतमाळ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दृष्टीक्षेप -२०३० या पुस्तकात दृष्टीक्षेपात वाशिम जिल्ह्याची माहिती, जिल्ह्याचे ठळक वैशिष्ट्ये अनुसूचित जातीच्या वस्त्यांची संख्या, जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाची सद्यस्थिती,ध्येय आणि उद्दिष्टे,शिक्षण योजनांची दूरदृष्टीता, कृषी व संलग्न सेवा योजनेच्या दूरदृष्टीता,आर्थिक विकास व व्यवसाय शिक्षण योजनांची दूरदृष्टीता,शारीरिक व नैतिक मूल्यांचा विकास शिक्षण योजनांची दूरदृष्टीता,पाणी पुरवठा व आरोग्य सेवा, महिला व बालकल्याण, प्रचार व प्रसिध्दी,विविध योजना, पंजाबराव देशमुख पीक उत्पादन प्रोत्साहन योजना,अनुसूचित जाती/नवबौध्द यांच्या मालकीच्या विहिरींचे विद्युतीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, महिला व बाल कल्याण समिती, वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी राखीव निधी याबाबतची माहिती दिली.
Comments
Post a Comment