नागपूर-हैद्राबाद-नागपूरल ेखाधिकारी युसूफ शेख यांनी 70 तासात गाठलेसायकल मोहिमेतून 1 हजार कि.मी. अंतर



नागपूर-हैद्राबाद-नागपूर

लेखाधिकारी युसूफ शेख यांनी 70 तासात गाठले

सायकल मोहिमेतून 1 हजार कि.मी. अंतर

        वाशिम, दि. 20 (जिमाका) : अनेकांना काही तरी करण्याचा छंद असतो. हा छंद ते वेळातून वेळ काढून जोपासत असतात. कुणाला गाण्याचा तर कुणाला वाचनाचा तर कुणाला धावण्याचा, सायकल चालविण्याचा तर काहींना वेगवेगळे छंद असतात. असाच एक छंद जोपासला आहे तो आपल्या कामातील व्यस्ततेतून. जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी युसूफ शेख यांनी. त्यांचा सायकल चालविण्याचा छंदच त्यांना अनेक सायकल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करु लागला.

           नुकतीच त्यांनी फ्रान्सच्या ऑडेक्स क्लबच्या वतीने नागपूर रॅडोनियर्सव्दारा आयोजित नागपूर ते हैद्राबाद परत नागपूर अशी 1 हजार कि.मी.ची सायकल मोहिम केवळ 70 तासात पुर्ण केली. या मोहिमेला नागपूर येथील झिरो माईल फ्रिडम पार्क येथून सुरुवात झाली. नागपूर-बुटीबोरी-जांब-हिंगणघाट-पांढरकवडा-आदिलाबाद-निर्मल-कामारेड्डी- हैद्राबाद व परत त्याच मार्गाने नागपूर. नागपूर येथून जातांना तेलंगाणा राज्यातील निर्मल जिल्हयातील 25 ते 30 कि.मी. चा अवघड घाट युसूफ शेख यांनी पार केला. श्री. शेख यांच्यासोबत एकूण 7 सायकलपटू सहभागी झाले होते. या सायकलपटूंनी 4 दिवस 3 रात्र सायकल प्रवास केला.

           यापूर्वी श्री. शेख यांनी 3 वेळा सुपर रॅडोनियर्स मोहिम पुर्ण केली आहे. वाशिम ते सावनेर-पांढुर्णा (मध्यप्रदेश) परत वाशिम हे 600 कि.मी. अंतर 3 वेळा, वाशिम ते वरुड 400 कि.मी. वाशिम ते अमरावती 300 कि.मी 3 वेळा, वाशिम ते धनज (बु.) 200 कि.मी. 4 वेळा तसेच वाशिम ते देवळी (वर्धा) 400 कि.मी., नाशिक ते शिरपूर (धुळे) 400 कि.मी. आणि अमरावती ते सिंदखेडराजा 600 कि.मी. पुर्ण केले आहे.

           याशिवाय श्री. शेख यांनी पोहणे आणि धावण्याची सुध्दा आवड जोपासली आहे. केवळ आपली आवड जोपासून विविध मोहिमेत त्यांनी सहभागी होऊन यश संपादित केले आहेच. सोबतच आपल्या कामाची जबाबदारी सुध्दा तितक्याच तत्परतेने श्री. शेख यांनी पार पाडली आहे. अलिकडेच त्यांचा लेखाविषयक कामकाजात उत्कृष्ट काम केल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी देखील त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.     

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश