सामाजिक न्याय पर्वानिमित्त दक्षता पथक प्रकरणांची त्रृटी पूर्तता
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक न्याय पर्वानिमित्त
दक्षता पथक प्रकरणांची त्रृटी पूर्तता
वाशिम,दि.२५ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संकतल्पनेतुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे.याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमद्वारे आज २५ एप्रिल रोजी दक्षता पथकाने चौकशी करुन
अहवाल सादर केलेल्या प्रकरणी अर्जदारांकडून नियम २५ अन्वये नोटीसींच्या अनुषंगाने प्रकरणांचा जलदगतीने निपटारा व्हावा म्हणून त्रुटी पूर्तता शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात निवडणुक संबंधित अर्जदारांनी सहभाग नोंदविला.सामाजिक न्याय पर्व काळात अशाच प्रकारचे विविध उपक्रम समिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे उपायुक्त तथा सदस्य उमेश सोनवणे यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment