फेरीवाल्यांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा नगर परिषदेचे आवाहन




फेरीवाल्यांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा

नगर परिषदेचे आवाहन

        वाशिम, दि. 19 (जिमाका) : शहरातील सर्व फेरीवाल्यांकरीता नगर परिषद वाशीमच्या वतीने पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत व शासकीय योजनांच्या जत्रेअंतर्गत कर्ज मेळावा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांचे मोबाईल ॲपव्दारे सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे, अशा लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ऑनलाईन अर्ज भरुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कर्ज मंजूर व्हावे. याकरीता नगर परिषद वाशिमअंतर्गत शहर उपजीविका केंद्र, युनियन बँकेच्या मागे, बालाजी संकुल, वरचा मजला, पाटणी चौक, वाशीम येथे कर्ज ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता दररोज सशुल्क दरात अर्ज भरण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

          फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याकरीता सुविधा असून पात्र फेरीवाल्यांनी आपले कागदपत्रे घेऊन ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा. शिबिराच्या दिवशी बँक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत कर्ज मंजूर होणार आहे. तरी यापूर्वी बँकेमध्ये अर्ज केलेला असल्यास तो बँकेकडे प्रलंबित असल्यास अर्ज केलेल्या अर्जाची एक प्रत तसेच बँकेने योग्य कारणांसह परत अर्ज केला असल्यास परत अर्ज भरण्याची सुविधा असून कर्जासाठी अर्ज भरून नोदणी करावी.

          ज्या लाभार्थ्यांचे कर्ज वाटप झाले आहे, त्यांना क्युआरकोडच्या डिजिटल साधनाच्या माध्यमातून व्यवहार करता यावे. याकरीता फोन पे, गुगल पे यांचा वापर करुन डिजिटल साधनांचा वापर करावा. कॅश बॅकचा लाभ मिळवून घ्यावा. बँकेमधून क्युआरकोडचे वाटप होणार असून याबाबत जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी देखील लाभ घ्यावा.

          ज्या लाभार्थानी मागील वर्षात १० हजार रुपये कर्ज योजनेचा लाभ घेऊन सुरळीत परतफेड केली आहे, त्यांनी पहिले कर्ज परतफेड केल्याचा दाखला घेऊन २० हजार रुपये कर्ज योजनेचा ऑनलाईन अर्ज भरावा. ज्यांनी अर्ज भरला असेल तो बँकेकडे प्रलंबित असल्यास सोबत घेऊन यावा. बँक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत अर्ज निकाली काढता येईल. नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी आधार संलग्न मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, मतदान काई, रेशनकार्ड, बँक पासबक, फेरीव्यवसाय फोटो, नगर पालिकेची बैठक पावती, सर्व्हेक्षण झाल्याची पोच पावती आदी कागदपत्रे सोबत घेऊन संपर्क करावा. असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम. यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश