कृषी निविष्ठांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण समिती
- Get link
- X
- Other Apps
कृषी निविष्ठांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण समिती
वाशिम दि २५( जिमाका ) कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून विक्री होणाऱ्या बियाणे,खते व कीटकनाशके इत्यादी निविष्ठांच्या दर्जाबाबत शेतकऱ्यांकडून, अन्य व्यक्ती, संस्था व प्रसिद्धी माध्यमातून तक्रारी प्राप्त होतात. अशा तक्रारीची त्वरित तक्रार घेण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. वाशिम उपविभागीय कृषी अधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहेत.सर्व तालुका कृषी अधिकारी,कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व महाबीजचे प्रतिनिधी हे सदस्य तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारी या तक्रार निवारण समितीकडे कराव्यात. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment