१० एप्रिल रोजी सत्यमेव जयते फार्मर्स कप स्पर्धेतील विजेत्या शेतकरी गटांचा सत्कार समारंभ


१० एप्रिल रोजी सत्यमेव जयते फार्मर्स कप स्पर्धेतील विजेत्या शेतकरी गटांचा सत्कार समारंभ

वाशिम दि.९(जिमाका) कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),वाशिम आणि पानी फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा या गटशेती स्पर्धेतील विजेत्या शेतकरी गटांचा सत्कार समारंभ १० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता नियोजन भवन सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आयोजित केला आहे.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस हे असतील.प्रमुख मार्गदर्शक म्हणून पानी फाउंडेशनचे श्री.नामदेव ननावरे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी  शैलेश हिंगे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर व आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांची उपस्थिती राहणार आहे.
          पानी फांऊंडेशन आयोजित फार्मर कप गट शेती स्पर्धेमध्ये पुरस्कार प्राप्त शेतकरी गट परिवर्तन शेतकरी गट वाढोदा ता.वरुड जि. अमरावती राज्यस्तरीय प्रथम,एकता शेतकरी उत्पादक गट मिर्झापूर ता. अकोट जि.अकोला,तालुकास्तरीय प्रथम - समता महिला शेतकरी गट पाराभवानी ता.बार्शीटाकळी जि. अकोला,तालुकास्तरीय प्रथम, माऊली शेतकरी गट नागी ता. मंगरूळपीर - तालुकास्तरीय प्रथम, विजयपथ शेतकरी गट जयपुर ता. कारंजा - संयुक्त तालुकास्तरीय प्रथम,एकता शेतकरी गट विळेगाव ता.कारंजा( लाड) -संयुक्त तालुकास्तरीय प्रथम या पुरस्कार प्राप्त गटांचा सत्कार समारंभ तसेच सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेतील गटांचे उत्कृष्ट कार्याबाबत बळीराम शेतकरी गट दोनद बु. ता. कारंजा,जय ज्योती जय क्रांती शेतकरी गट उंबर्डा बाजार ता. कारंजा,समृद्ध शेतकरी गट जांब ता. मंगरूळपीर,अर्णवी शेतकरी गट चिंचाळा ता. मंगरूळपीर, नेचर फार्म शेतकरी गट जनुना बु.ता. मंगरूळपीर,नवअंकुर शेतकरी गट लखमापूर ता. मंगरूळपीर,राजश्री शाहू महाराज शेतकरी गट सायखेडा ता. मंगरूळपीर या गटांना गौरविण्यात येणार आहे .
       या सत्कार समारंभात शेतकरी गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सत्यमेव जयते फार्मर कपमध्ये सहभागी शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी तसेच आत्मा प्रकल्पातंर्गत शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.असे आवाहन वाशिम आत्माच्या प्रकल्प संचालक,यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश