कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 30 एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी


कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 

30 एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी 

वाशिम दि.२५ (जिमाका) कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजाच्या संचालक मंडळाच्या सन २०२३ -२८ या कालावधीच्या निवडणुकीकरिता मतदान ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी त्याच दिवशी दुपारी ४ वाजतानंतर मतदान संपल्यानंतर मंगरुळपीर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती,शेतकरी निवास येथे होणार आहे.
           या निवडणुकीकरिता कारंजा येथील मूलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल,मंगरूळ वेस,दारव्हा रोड, कारंजा येथे मतदान केंद्र आहे.या केंद्रात १९२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.सेवा सहकारी संस्थेचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य पुढील शहर व गावातील आहे. यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी संस्था कारंजा,भडशिवनी,दादगाव,धामणी, गायवळ,गिर्डा,कामठवाडा, काकडशिवणी,काळी,पसरणी,पिंपरी (बारहाट),पिंपळगाव,सोहळ,शहा व शेलुवाडा येथील एकूण १९२ मतदार,   
             जिल्हा परिषद शाळा पोहा येथील मतदान केंद्रात पोहा,बेलमंडळ, किनखेड,लोहगाव,लोहारा,महागाव, मुरंबी,पारवा,शेवती, वळवी व वाई येथील १४० मतदार मतदान करतील.
जिल्हा परिषद हायस्कूल कामरगाव येथील मतदान केंद्रावर १६६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.यामध्ये कामरगाव, बांबर्डा,बेंबळा,बेलखेड, भुलोडा, जामठी,जानोरी,काजळेश्वर, खेर्डा(बु),लाडेगाव,पलाना,टाकळी शिवण(बु), येथील मतदारांचा समावेश आहे.
                जिल्हा परिषद केंद्र शाळा धनज (बु) येथील मतदान केंद्रावर धनज(बु),भामदेवी,डोंगरगाव,धनज(खु),हिंगणवाडी,हिवरा(लाहे),लोणी(अरब),माळेगाव,मेहा,पिंपरी(मोडक),
राहटी येथील १४३ मतदार मतदान करतील.
                उंबर्डाबाजार येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील मतदान केंद्रावर उंबर्डाबाजार, दुघोरा,दोनद(बु),धानोरा(ताथोड), इंझा,खेर्डा(कारंजा),पिंपरी(वरघट),
सुकळी,वडगाव (रंगे), यावर्डी,येवता व मनभा येथील 154 मतदार मतदान करतील.
          मूलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल मंगरूळपीर वेस,दारव्हा रोड कारंजा येथे आखातवाडा,धामणी (खडी),भडशिवनी,गायवळ,गिर्डा, जयपूर,जाबं,काकडशिवनी, कामठवाडा,कोळी,किन्ही (रोकडे), मोखड(पिंपरी),पसरणी,शहा,सोहळ वडगाव(इजारा),वाघोळा,वालई, पिंपळगाव(खुर्द),दादगाव व रामनगर येथील 173 मतदार,जिल्हा परिषद शाळा पोहा येथील मतदान केंद्रावर बेलमंडळ,किनखेड,लोहारा,लोहगाव, महागाव,मुरंबी,परावा(कोहर),पोहा,
शेलुवाडा,शेवती,शिवनगर,तुळजापूर, वढवी वाई येथील १२२ मतदार तर जिल्हा परिषद हायस्कूल कामरगाव येथील मतदान केंद्रावर अंतरखेड, बांबर्डा,बेलखेड,बेंबळा,जानोरी, कामरगाव,कामठा,खेर्डा(बु), काजळेश्वर,लाडेगाव,म्हसला,पलाना पिंपळगाव(बु),शिवण(बु), टाकळी (खुर्द),विळेगाव,बापटी व खानापूर येथील 169 मतदार मतदान करतील.
          जिल्हा परिषद केंद्र शाळा धनज(बु) या मतदान केंद्रावर भामदेवी, भिवरी, ढंगारखेड, धनज(खु),धोत्रा (जहागीर),डोंगरगाव, हिंगणवाडी, हिवरा(लाहे),लोणी (अरब),माळेगाव,मेहा,मोहगव्हाण, निंबा(जहा),राहटी,सिरसोली, तारखेडा,वीरगव्हाण,झोडगा व पिंपरी (मोडक) येथील 165 मतदार आणि उंबर्डाबाजार जिल्हा परिषद हायस्कूल मतदान केंद्रावर धानोरा (ताथोड), दिघी,दोनद(बु),दुधोरा,इंझा,कार्ली, खेर्डा(कारंजा),मनभा, पिंपरी(वरघट), सोमठाणा, सुकळी,उंबर्डाबाजार, वडगाव(रंगे),यावर्डी व येवता येथील 127 मतदार मतदान करतील.
      मुलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल,मंगरूळ वेस,दारव्हा रोड, कारंजा येथील मतदान केंद्रावर व्यापारी व अडते असे 467 मतदार व त्याच केंद्रावर हमाल व मापारी असे 302 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश