17 एप्रिल रोजीमहिला लोकशाही दिन
- Get link
- X
- Other Apps
17 एप्रिल रोजी
महिला लोकशाही दिन
वाशिम, दि. 13 (जिमाका) : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या तक्रारी व अडचणींचे शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे, एप्रिल 2023 चा महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment