माविमचे उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी सन्मानित


माविमचे उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी सन्मानित
 
वाशिम दि.२९(जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ,माविम महिला प्रांगण येथे नुकतेच नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्द्म विकास प्रकल्पामध्ये आयोजित सन २०२३-२०२४ चे कार्यनियोजन व २०२२-२०२३ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,आय.सी.सी.आय बँकेचे विभागीय अधिकारी सुहास बोबडे व जिल्हा प्रतिनिधी प्रदीप सांभारे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख कल्पना लोहकपुरे सहायक सनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपूरे व कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके यांची उपस्थिती होती.     
            श्री.पवार म्हणाले,जिल्हयात प्रत्येक गटातील महिलांना व्यवसायाच्या प्रवाहात आणणे व त्याकरीता विविध कार्यक्रमाची सांगड घालावी.बँकाचे याकरीता अधिक सहकार्य अपेक्षित आहे. महिलांचे वैयक्तिक व सामुहिक उद्योग उभे राहतील असे नियोजन करावे.विविध योजनाच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक लाभ मिळेल यासाठी सर्व विभागासोबत समन्वय साधावा असे श्री.पवार यांनी सांगितले.
         श्री.नागपुरे म्हणाले, जिल्हयातील माविम कार्यकर्त्या व सर्व बचतगटातील महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी करण्याचे लक्ष असून त्याबाबत निश्चित कार्यक्रम आखण्यात येईल. महिलाकरीता समानतेचा दृष्टीकोन ठेवणा-या पुरुषांचा तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर सन्मान करण्याचे नियोजन असल्याचे सांगून यामधून स्रियांचे समाजातील स्थान उंचावण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
          श्री.खडसे यावेळी म्हणाले, बचत गटातील महिलांनी अधिकाधिक उद्योग व्यवसाय सुरु आपल्या उत्पादनात वाढ करावी. यंदाचे वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.यावर्षात शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांना मिळावा यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात माविमच्या बचतगटातील महिला व सहयोगीनी यांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे सांगितले.
            श्री.बोबडे यांनी आय. सी.आय.सी.आय बँक ही महिला बचतगटाच्या आर्थिक विकासात नेहमीच हातभार लावेल याची ग्वाही दिली.
         यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन २०२२-२०२३ मध्ये माविमच्या विविध कार्यक्रमात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
       ज्यांना सन्मानित करण्यात आले,त्यामध्ये लोकसंचालीत साधन केंद्र वाशीम,अनसिंग,कळंबा (महाली), मालेगाव,रिसोड,कारंजा, लोकसंचालीत साधन केंद्र,अल्प  संख्यांक लोकसंचालीत साधन केंद्र कारंजा यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. 
        यावेळी जिल्हयातील सर्व लोक संचालीत साधन केद्र व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगीनी, उपजीविका सल्लागार आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.    
             सहायक जिल्हा समन्वय अधिकारी देशमुख यांनी प्रास्ताविकातून २०२३-२०२४ मध्ये राबवायचे उपक्रम व त्याचे अधिकचे नियोजनबाबत सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार कल्पना लोहकपुरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश