दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर २ मे - वाशिम,३ मे -मंगरुळपीर, ४ मे - मानोरा, ५ मे -कारंजा
दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर
२ मे - वाशिम,३ मे -मंगरुळपीर,
४ मे - मानोरा, ५ मे -कारंजा
वाशिम,दि.२८ (जिमाका) दिव्यांग सशक्तीकरण विभाग,सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार यांच्या एडीप योजनेंतर्गत वाशिम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण
करण्यासाठी २ मे ते ५ मे २०२३ या कालावधीत तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
वाशिम तालुक्यासाठी २ मे रोजी जिल्हा परिषद शाळा,जूनी जि.प. जवळ, सकाळी ८ ते दुपारी १२,व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी श्री.तोतेवाड यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९७३०९३९८४० आहे.
मंगरूळपीर तालुक्यासाठी ३ मे रोजी जि.प हायस्कूल,अकोला चौक, मंगरूळपीर येथे सकाळी ८ ते दुपारी १२ ,व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.गटविकास अधिकारी के.व्ही.घुगे यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७३७८९०८९९० आहे.
मानोरा तालुक्यासाठी ४ मे रोजी एल.एस.पी.एम हायस्कूल येथे सकाळी ८ ते दुपारी १२,व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी बी.टी.बायस यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी ९८६०१५०९८१ आहे.
कारंजा तालुक्यासाठी ५ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ , व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी एस.पी.पडघान यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी ९४२१७३५७२१ आहे.
तपासणी शिबिरामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त,
उत्पन्न दाखला रु. २२५००/- किंवा त्यापेक्षा कमी प्रति माह,
आधार कार्डची झेरॉक्स प्रत,२ पासपोर्ट छायाचित्र या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे.
Comments
Post a Comment