21 एप्रिलपासून शारिरीक ‍शिक्षकांचे शिबीर




21 एप्रिलपासून शारिरीक ‍शिक्षकांचे शिबीर

        वाशिम, दि. 18 (जिमाका) : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण- 2012 अंतर्गत क्रीडा धोरणातील खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाच्या नवीन खेळ व खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शारिरीक शिक्षकांना देणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिमच्या वतीने 21 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत शारिरीक शिक्षक/ क्रीडा शिक्षकांचे निवासी शिबीर जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे.

         हे शिबीर निवासी स्वरुपाचे असून सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात मैदानावर प्रशिक्षणातून मार्गदर्शन तसेच दुपारच्या सत्रात विविध तज्ञांव्दारे विविध विषयांची माहिती देण्यात येणार आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था तसेच नियमित प्रशिक्षणार्थींना ट्रॅकसुट देण्यात येणार आहे.

             शिबीरामध्ये शिक्षकांना तंत्रशुध्द व नवीन खेळाविषयी खेळाचे नियम व अटी इत्यादीचे नविन अद्यावत ज्ञान देण्यावर भर राहणार आहे. शिबीरात मानसोपचार तज्ञ, आहार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ व प्रथमोपचार तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबीराकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, बालाजी शिरसीकर यांच्याशी संपर्क साधावा. असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश शिंदे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश