जात पडताळणी समितीचा ऑनलाईन वेबिनार संपन्न




जात पडताळणी समितीचा ऑनलाईन वेबिनार संपन्न

        वाशिम, दि. 18 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संकल्पनेतून 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमकडून आज 18 एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य/मुख्याध्यापक व कर्मचारी यांचा ऑनलाईन वेबिनार घेण्यात आला. या वेबिनारमध्ये प्राचार्य/मुख्याध्यापक व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश