पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ऑडिओ - व्हिडिओ जिंगल्सच्या डीव्हीडीचे प्रकाशन
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ऑडिओ - व्हिडिओ जिंगल्सच्या डीव्हीडीचे प्रकाशन
वाशिम दि.१० (जिमाका) जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नुकतेच सर्वसाधारण योजनांवर आधारित तीन योजनांच्या ऑडिओ - व्हिडिओ जिंगल्सच्या डीव्हीडीचे प्रकाशन नुकतेच त्यांच्या यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ या वर्षात जिल्हा माहिती कार्यालयाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,माझी कन्या भाग्यश्री आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या तीन योजनांवर हे ऑडिओ - व्हिडिओ तयार केले आहे.योजनांवर तयार करण्यात आलेल्या या जिंगल्समुळे लाभार्थ्यांना या योजनांची माहिती मिळून योजनांचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment