सामाजिक न्याय पर्वानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक न्याय पर्वानिमित्त
रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
वाशिम, दि. 19 (जिमाका) : आज 19 एप्रिल रोजी शासकीय रक्तकेंद्र, जिल्हा रुग्णालय, वाशिम येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा जात पडताळणी समिती आणि जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, डॉ. डी. बी. खेळकर, डॉ. सी. के. यादव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, डॉ. पी. एम. मोरे, रक्तपेढी प्रमुख, डॉ. सी. डी. ढाले, वैद्यकीय अधिकारी सचिन दंडे, जनसंपर्क अधिकारी श्रीमती डाखोरे, रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीमती जाधव, संदिप मोरे, शालिनी सावळे, रक्तपेढी परिचर लक्ष्मण काळे, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी व सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराला सुरुवात करण्यात आली. शिबीरामध्ये सर्वप्रथम ब्रिक्स इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापक अनिल गायकवाड यांनी रक्तदान व तपासणी केली. त्यानंतर प्रमोद गायकवाड, पंकज घोडे, तालुका समन्वयक गोपाल करंगे, व गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल एस. एस. इंगोले यांनी तपासणी व रक्तदान केले. तसेच इतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करुन रक्तदान केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment