सामाजिक न्याय पर्वसर्व महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विविध उपक्रम
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक न्याय पर्व
सर्व महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विविध उपक्रम
वाशिम, दि. 03 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमीत्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत जिल्हास्तरीय सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय पर्व कालावधी दरम्यान जिल्हयातील सर्व महाविद्यालये, सर्व अनुदानित/ विनाअनुदानित आश्रम शाळा, शासकीय, निमशासकीय, निवासी शाळा, शासकीय वस्तीगृहामध्ये समान संधी केंद्रामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यक्रम घेण्यात येत आहे.
4 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्रामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत निबंध स्पर्धा, पथनाट्य, वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 14 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्रामार्फत आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम,व्याख्यान, चर्चासत्र घेण्यात येणार आहेत. 29 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय सर्व महाविद्यालयांमध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती व संबंधीत योजनांसंदर्भात सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.
तरी जिल्हयातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायीक,बिगरव्यावसायीक महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी नियोजित कार्यक्रमांचे आपल्या महाविद्यालयांमध्ये आयोजन करावे व जास्तीत जास्त संख्येने लाभार्थ्यांनी उपस्थित राहुन योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment