सामाजिक न्याय भवनातनवउद्योजकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबीर संपन्न



सामाजिक न्याय भवनात

नवउद्योजकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबीर संपन्न

           वाशिम, दि. 18 (जिमाका) : आज 18 एप्रिल रोजी डॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनवाशिम येथे सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयजिल्हा समाज कल्याण अधिकारीजिआणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवाशिम यांच्या संयुक्त वतीने शासकीय योजनांची जत्रा  सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत नवउद्योजकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनेश ‍बारापात्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे व्यवस्थापक प्रसन्न रत्नपारखी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, मिटकॉनचे  सहाय्यक सत्येंद्र भगतश्रीठोंबे व समाज कल्याण कार्यालयातील लघुटंकलेखक  संजय निमन यांची उपस्थिती होती.

            मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन  महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलेप्रस्ताविकातून समाज कल्याण निरीक्षक राहूल शिरभाते यांनी समाज कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बीज भांडवलांच्या योजना व मार्जिन मनी योजनेबाबतची माहिती यावेळी दिली.

           श्री. ‍बारापात्रे यांनी नवउद्योजकांसाठी उद्योजकतेबाबत मार्गदर्शन केलेश्रीकोकडवार म्हणाले, प्रत्येक उद्योग  व्यवसाय उभारणीसाठी शासन विविध योजनांद्वारे आर्थिक मदत करत असतेत्यामुळे आपण आपल्या जिल्ह्यातील गरजा ओळखून उद्योग किंवा व्यवसाय उभारला पाहिजे.

            श्रीरत्नपारखी यांनी जिल्ह्यामध्ये उद्योग वाढीस लागणे आवश्यक असल्याचे सांगून उद्याची योजना करणारा म्हणजे उद्योजक अशी सोपी व्याख्या त्यांनी सांगितलीउद्योग उभारणीसाठी सर्वप्रथम आपल्या मनाची तयारी केली ‍ पाहिजेआपण उभारत असलेल्या उद्योगाबाबत सर्व माहिती गोळा केली पाहिजे असे सांगितले.

           श्रीखंबायत यांनी विविध योजनेअंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.

           कार्यक्रमाचे संचालन प्रागजानन बारड यांनी केले. आभार प्रदिप गवळी यांनी मानलेकार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी  कर्मचारी, महामंडळातील अधिकारी  कर्मचारीसमाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गसर्व ब्रिक्स प्रालि क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश