वाशिम येथील मुलींच्या वसतीगृहात निबंध स्पर्धा उत्साहात
वाशिम येथील मुलींच्या वसतीगृहात
निबंध स्पर्धा उत्साहात
वाशिम, दि. 06 (जिमाका) : मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह वाशिम येथे 1 एप्रिल ते 1 मे 2023 पर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक न्याय पर्वाच्या अनुषंगाने शासकीय वसतीगृहात 4 एप्रिल रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 38 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहपाल श्रीमती व्ही.एम. लाकडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून समुपदेशक शेख शबनम उपस्थित होत्या. श्रीमती शबनम यांनी महिला सक्षमीकरण व आहार या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली भोयर यांनी तर उपस्थितांचे आभार रुपाली साभादिंडे यांनी मानले.
*******
Comments
Post a Comment