पोकरा प्रकल्पाअंतर्गत १६४ शेतकरी कंपन्या व गटांना १५ कोटी ७७ लक्ष रुपये अनुदानाचे वितरण
पोकरा प्रकल्पाअंतर्गत १६४ शेतकरी कंपन्या व गटांना १५ कोटी ७७ लक्ष रुपये अनुदानाचे वितरण
वाशिम दि २१(जिमाका) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा प्रकल्पाच्या माध्यमातून निवड केलेल्या जिल्ह्यातील १४९ गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याच्या दृष्टीने गाव पातळीवर असलेल्या कृषी संजीवनी समितीच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.संबंधित गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांना पाठबळ देण्यात येत आहे.पोकरा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या या गावातील १६४ शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांना कृषीविषयक बाबीसाठी १५ कोटी ७७ लक्ष रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.
पोकराच्या या गावातील शेतकऱ्यांना शेती यांत्रिकी पद्धतीने करता यावी तसेच शेतीची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी ११६ शेतकरी गटांना अवजारे बँक तयार करण्यासाठी कृषी यंत्रे खरेदीसाठी १० कोटी ९७ लक्ष रुपये,६ शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांचा उत्पादित माल ठेवण्यासाठी गोदामाचे बांधकाम करण्यासाठी ८३ लक्ष ७८ हजार रुपये, शेतातील उत्पादित केलेल्या धान्याची स्वच्छता व प्रतवारीसाठी लागणारे सेपरेटर खरेदी करण्यासाठी ४ शेतकरी गटांना ३२ लक्ष रुपये,दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांना ऑइल युनिट सुरू करण्यासाठी २३ लक्ष ९३ हजार रुपये, २६ शेतकरी गटांना धान्य सुकवणी केंद्र तयार करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष रुपये,८ शेतकरी गटांना शेळी पैदास केंद्रासाठी ७६ लक्ष ३९ हजार रुपये आणि दोन शेतकरी गटांना हळद प्रक्रिया व गांडूळ खत निर्मितीसाठी १४ लक्ष ६३ हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे.
ज्या शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांना या प्रकल्पाअंतर्गत विविध कृषीविषयक बाबींसाठी अनुदान देण्यात आले आहे.त्या कंपन्या व गटांशी जुळलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
Comments
Post a Comment