Posts

Showing posts from May, 2026

🔱नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्ह*🚩✨🙏🌼*नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७*🙏🌼#नाशिक #त्र्यंबकेश्वर #सिंहस्थकुंभ२०२७ #कुंभमेळा #हरहरमहादेव #trimbakeshwar #KumbhMela2027

Image
🔱नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्ह*🚩✨ 🙏🌼*नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७*🙏🌼 #नाशिक #त्र्यंबकेश्वर #सिंहस्थकुंभ२०२७ #कुंभमेळा #हरहरमहादेव #trimbakeshwar #KumbhMela2027

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचेमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

Image
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण   मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊ...

सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'चे अधिकृत बोधचिन्ह...#KumbhMela2027 #Nashik #OfficialLogo

Image
सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'चे अधिकृत बोधचिन्ह... #KumbhMela2027 #Nashik #OfficialLogo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्ह अनावरण' कार्यक्रमामध्ये विविध आखाड्यातील संत-महंत यांचा सत्कार केला.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सामंत, गीतकार प्रसून जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.#Maharashtra #LogoLaunch #KumbhMela2027

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्ह अनावरण' कार्यक्रमामध्ये विविध आखाड्यातील संत-महंत यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सामंत, गीतकार प्रसून जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #LogoLaunch #KumbhMela2027

३,०६७ प्रवेशिका… ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धक… आणि अखेर निवडले गेले नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे अधिकृत बोधचिन्ह!देशभरातील तरुण डिझाइनर्सचा उत्स्फूर्त सहभाग विशेष ठरला.#Sinhastha2027 #LogoLaunch #Maharashtra

Image
३,०६७ प्रवेशिका… ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धक… आणि अखेर निवडले गेले नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे अधिकृत बोधचिन्ह! देशभरातील तरुण डिझाइनर्सचा उत्स्फूर्त सहभाग विशेष ठरला. #Sinhastha2027 #LogoLaunch #Maharashtra

पुण्याचे सुमित काटे यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ लोगो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना ३ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.#Kumbh2027 #CreativeIndia

Image
पुण्याचे सुमित काटे यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ लोगो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना ३ लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. #Kumbh2027 #CreativeIndia

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे बोधचिन्ह म्हणजे अध्यात्म आणि परंपरेचे प्रतीक🔱 भगवान शंकराचे त्रिशूळ🛕 त्र्यंबकेश्वर मंदिर🌊 गोदावरी नदीही संकल्पना भाविकांना आध्यात्मिकतेची अनुभूती देणारी ठरत आहे.#SpiritualIndia #KumbhMela

Image
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे बोधचिन्ह म्हणजे अध्यात्म आणि परंपरेचे प्रतीक 🔱 भगवान शंकराचे त्रिशूळ 🛕 त्र्यंबकेश्वर मंदिर 🌊 गोदावरी नदी ही संकल्पना भाविकांना आध्यात्मिकतेची अनुभूती देणारी ठरत आहे. #SpiritualIndia #KumbhMela

MyGov आणि Association of Designers of India यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोगो स्पर्धेला देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला.तरुणाईच्या सर्जनशीलतेला मिळाले मोठे व्यासपीठ.#DesignIndia #YouthPower

Image
MyGov आणि Association of Designers of India यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोगो स्पर्धेला देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला. तरुणाईच्या सर्जनशीलतेला मिळाले मोठे व्यासपीठ. #DesignIndia #YouthPower

१८ ते २४ वयोगटातील युवक-युवतींचा सिंहस्थ कुंभमेळा लोगो स्पर्धेत सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला.

Image
१८ ते २४ वयोगटातील युवक-युवतींचा सिंहस्थ कुंभमेळा लोगो स्पर्धेत सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला. आध्यात्मिक वारसा आणि आधुनिक डिझाइन यांचा सुंदर मिलाफ देशाने अनुभवला. #YoungIndia #CreativeMinds #कुंभमेळालोगो

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक वारशाचे दर्शन घडते.काळाराम मंदिर आणि गोदावरी नदी यांचे प्रतीकात्मक दर्शन भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.#Nashik #Heritage

Image
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक वारशाचे दर्शन घडते. काळाराम मंदिर आणि गोदावरी नदी यांचे प्रतीकात्मक दर्शन भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. #Nashik #Heritage

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाची वैशिष्ट्ये...

Image
'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाची वैशिष्ट्ये... #कुंभमेळा२०२७ #KumbhMela2027

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’च्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे.

Image
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’च्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. आखाड्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रती आखाडा पाच कोटींचा निधी, छोट्या संस्थांसाठी प्रती संस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत केली. कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत व भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.  #कुंभमेळा२०२७ #KumbhMela2027

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · साधू, महंत यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन · आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुंबई, दि १३: नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी, छोट्या संस्थानसाठी प्रति संस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.             कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत व भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे...

'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या अधिकृत बोधचिन्हाची ‘वांद्रे-वरळी सी-लिंक’वर प्रदर्शित करण्यात आलेली विद्युत प्रतिमा.#कुंभमेळा२०२७#KumbhMela2027#कुंभमेळाबोधचिन्ह#KumbhMelaLogo

Image
'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या अधिकृत बोधचिन्हाची ‘वांद्रे-वरळी सी-लिंक’वर प्रदर्शित करण्यात आलेली विद्युत प्रतिमा. #कुंभमेळा२०२७ #KumbhMela2027 #कुंभमेळाबोधचिन्ह #KumbhMelaLogo

'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या अधिकृत बोधचिन्हाची गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे प्रदर्शित करण्यात आलेली विद्युत प्रतिमा.#कुंभमेळा२०२७#KumbhMela2027#कुंभमेळाबोधचिन्ह#KumbhMelaLogo#गेटवेऑफइंडिया#GatewayOfIndia

Image
'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या अधिकृत बोधचिन्हाची गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे प्रदर्शित करण्यात आलेली विद्युत प्रतिमा. #कुंभमेळा२०२७ #KumbhMela2027 #कुंभमेळाबोधचिन्ह #KumbhMelaLogo #गेटवेऑफइंडिया #GatewayOfIndia

'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या अधिकृत बोधचिन्हाची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (#सीएसएमटी) च्या इमारतीवर प्रदर्शित करण्यात आलेली विद्युत प्रतिमा.#कुंभमेळा२०२७#KumbhMela2027#कुंभमेळाबोधचिन्ह#KumbhMelaLogo#CSMT

Image
'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या अधिकृत बोधचिन्हाची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (#सीएसएमटी) च्या इमारतीवर प्रदर्शित करण्यात आलेली विद्युत प्रतिमा. #कुंभमेळा२०२७ #KumbhMela2027 #कुंभमेळाबोधचिन्ह #KumbhMelaLogo #CSMT

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचेमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

Image
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि  मान्यवरांच्या हस्ते अनावरण   मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आण...

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात झाली आहे.चला आपली जबाबदारी पार पाडूयाजनगणनेत सहभागी होऊया.

Image
#जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात झाली आहे. चला आपली जबाबदारी पार पाडूया जनगणनेत सहभागी होऊया.  #Census #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #SelfEnumeration

सोमनाथ ७५ वर्ष गौरवशाली वारशाची…प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची गौरवशाली साक्ष देत आहे.या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना…

Image
सोमनाथ ७५ वर्ष गौरवशाली वारशाची… प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची गौरवशाली साक्ष देत आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना… कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्राचा सामूहिक जप, सोमनाथ संबंधित कथांचे कथन आदी उपक्रमांचा समावेश... 🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६ 📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण  #सोमनाथ_स्वाभिमान_पर्व

सोमनाथ : वारसा ७५ वर्षांचा” विशेष उपक्रम सोमनाथ मंदिर येथे ८ ते ११ मे २०२६ दरम्यान “सोमनाथ : वारसा ७५ वर्षांचा” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Image
“सोमनाथ : वारसा ७५ वर्षांचा” विशेष उपक्रम सोमनाथ मंदिर येथे ८ ते ११ मे २०२६ दरम्यान “सोमनाथ : वारसा ७५ वर्षांचा” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   #सोमनाथ #Somnath #CulturalHeritage #IndianHeritage #Somnath75

सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते..

Image
#सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते.. #ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv

सोमनाथ आणि महाराष्ट्राचे नाते हे केवळ भूगोलाचे नाही, तर इतिहास, श्रद्धा, स्वाभिमान आणि पुनरुत्थानाच्या अखंड परंपरेचे आहे.

Image
#सोमनाथ आणि महाराष्ट्राचे नाते हे केवळ भूगोलाचे नाही, तर इतिहास, श्रद्धा, स्वाभिमान आणि पुनरुत्थानाच्या अखंड परंपरेचे आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पासून मराठा साम्राज्यापर्यंत अनेकांनी सोमनाथच्या पुनर्बांधणीसाठी दिलेले योगदान हे भारतीय संस्कृतीच्या अढळ सामर्थ्याचे प्रतीक आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनाला 75 वर्षे पूर्ण होत असताना, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपन्न होणाऱ्या 'सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026' च्या निमित्त 'सोमनाथ – अखंड श्रद्धेचे महापर्व' या माझ्या लेखातून सोमनाथचा गौरवशाली प्रवास नक्की वाचा. #Maharashtra #SomnathSwabhimaanParv #somnathtemple

जिथे श्रद्धा आहे, तिथे संस्कृती जिवंत आहे.

Image
संपूर्ण देशभरात सोमनाथ ज्योतिर्लिंग यांच्या १००० वर्षांच्या स्मरणोत्सवानिमित्त कलश यात्रा, भजन संध्या, स्वच्छता अभियान, ॐकार मंत्र जप, सोमनाथ संकल्प प्रतिज्ञा, मंत्र लेखन तसेच सोमनाथाशी संबंधित गौरवशाली कथांचे वाचन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आपणही आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा, अध्यात्मिक परंपरेचा व गौरवशाली वारशाचा अभिमान बाळगा. जिथे श्रद्धा आहे, तिथे संस्कृती जिवंत आहे. #Somnath #सोमनाथ #भारतीयसंस्कृती #सनातनपरंपरा #गौरवशालीवारसा #ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #SomnathYatra #CultureUnitesAll

सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा…

Image
सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा… प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची अभिमानाने घोषणा करत आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना… 🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६ 📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण

सोमनाथ स्वाभिमान पर्व

Image
सोमनाथ स्वाभिमान पर्व - हजारो वर्षांची अतूट श्रद्धा,अदम्य साहस आणि राष्ट्रस्वाभिमानाचा उत्सव! तुटून पडूनही पुन्हा पुन्हा उठणं - ही सोमनाथची अजरामर भावना आहे. 8 ते 11 मे 2026 - कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र उच्चारण आणि बरच काही! आपण पण आपला सहभाग निश्चित करा. अधिक माहितीसाठी क्लिक करा : 🔗 amritkaal.nic.in/somnath-swabhiman-parv #ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #SomnathYatra

#DidYouKnow?

Image
#DidYouKnow? शतकांपूर्वी सोमराज यांनी सोन्याचे सोमनाथ मंदिर उभारले, अशी आख्यायिका आहे. शतकानुशतके अनेक आक्रमणे, विध्वंस आणि पुनर्बांधणीचे चक्र सहन करत हे मंदिर श्रद्धा, स्वाभिमान आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनले आहे. सन १९५१ मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली आणि सोमनाथाचे वैभव पुन्हा उजळून निघाले. #ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #CultureUnitesAll

सोमनाथ स्वाभिमान महोत्सव - आपण पण आपला सहभाग निश्चित करा.

Image
सोमनाथ स्वाभिमान महोत्सव -  आपण पण आपला सहभाग निश्चित करा. अधिक माहितीसाठी क्लिक करा : 🔗 amritkaal.nic.in/somnath-swabhiman-parv #ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #SomnathYatra

सोमनाथची अजरामर भावना .8 ते 11 मे 2026 - कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र उच्चारण आणि बरच काही!

Image
सोमनाथ स्वाभिमान महोत्सव - हजारो वर्षांची अतूट श्रद्धा,अदम्य साहस आणि राष्ट्रस्वाभिमानाचा उत्सव! तुटून पडूनही पुन्हा पुन्हा उठणं - ही सोमनाथची अजरामर भावना आहे. 8 ते 11 मे 2026 - कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र उच्चारण आणि बरच काही! आपण पण आपला सहभाग निश्चित करा. अधिक माहितीसाठी क्लिक करा : 🔗 amritkaal.nic.in/somnath-swabhiman-parv #ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #SomnathYatra

सोमनाथ स्वाभिमान महोत्सव - हजारो वर्षांची अतूट श्रद्धा,अदम्य साहस आणि राष्ट्रस्वाभिमानाचा उत्सव!

Image
सोमनाथ स्वाभिमान महोत्सव - हजारो वर्षांची अतूट श्रद्धा,अदम्य साहस आणि राष्ट्रस्वाभिमानाचा उत्सव! तुटून पडूनही पुन्हा पुन्हा उठणं - ही सोमनाथची अजरामर भावना आहे. 8 ते 11 मे 2026 - कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र उच्चारण आणि बरच काही! आपण पण आपला सहभाग निश्चित करा. अधिक माहितीसाठी क्लिक करा : 🔗 amritkaal.nic.in/somnath-swabhiman-parv #ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #SomnathYatra

सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा…

Image
सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा… प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची गौरवशाली साक्ष देत आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना… 🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६ 📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण

मान्सूनपूर्व तयारीला गती देत यंत्रणांनी १५ मे पूर्वी कामे पूर्ण करावीत

Image
मान्सूनपूर्व तयारीला गती देत यंत्रणांनी १५ मे पूर्वी कामे पूर्ण करावीत     जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा सभा वाशिम,दि.५ मे (जिमाका) मान्सूनपूर्व तयारीला गती देत सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोर नियोजनाने काम करावे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात  मान्सूनपूर्व आढावा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक लता फड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह  विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यात संभाव्य पूरस्थिती, अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.  पाटबंधारे व जलसंधारण विभागाने तातडीने ॲक्शन प्लॅन तयार करावा...

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन   वाशिम, दि. १ मे (जिमाका) जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्याला अधिक प्रगत, समृद्ध आणि आदर्श बनवूया पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे महाराष्ट्र दिनाचा ६६ वा वर्धापन दिन शासकीय समारंभ उत्साहात साजरा पोलीस कवायत मैदान येथेपालकमंत्री यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार शेतकऱ्यांसाठी महाबीजच्या चार महत्त्वपूर्ण उत्पादनांचे लोकार्पण

Image
जिल्ह्याला अधिक प्रगत, समृद्ध आणि आदर्श बनवूया            पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे  महाराष्ट्र दिनाचा ६६ वा वर्धापन दिन शासकीय समारंभ उत्साहात साजरा  पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार  शेतकऱ्यांसाठी महाबीजच्या चार महत्त्वपूर्ण उत्पादनांचे लोकार्पण  वाशिम, दि. १ मे (जिमाका) जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने, समन्वयाने आणि ठोस कृतीतून प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा त्यात तितकाच सहभाग महत्त्वाचा आहे. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत संतुलित प्रगती साधत, स्थानिकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. महिला सक्षमीकरण, युवकांचे कौशल्य विकास, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देत आपण पुढे गेलो, तर वाशिम जिल्हा केवळ प्रगतच नव्हे तर समृद्ध आणि आदर्श जिल्हा म्हणून राज्...