अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मद्यविक्री दुकाने बंद राहणार


अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त
मद्यविक्री दुकाने बंद राहणार
        
वाशिम,दि.31(जिमाका) जिल्हयात 1 ऑगस्ट 2023 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.वाशिम शहर व रिसोड शहरात मोठया प्रमाणात मिरवणुका काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये मोठया संख्येने लोकांचा सहभाग राहणार आहे.जिल्हयात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी.हा उत्सव शांततेने पार पडावा.कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) नुसार 1 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण वाशिम व रिसोड शहरातील मद्यविक्रीची परवाना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकाच्या नावे असलेला परवाना मुंबई दारुबंदी कायद्याअंतर्गत रद्द करण्यात येईल. असेही या आदेशात नमूद केले आहे.
                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे