शासनाच्या वर्षपुर्तीनिमित्त निमित्त घडीपुस्तिकेचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते प्रकाशन



वाशिम : विद्यमान राज्य शासनाच्या वर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत निर्मित पुस्तिका ‘पहिले पाऊल वचनपूर्तीचे’, लोकराज्य मासिकाचा विशेषांक व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या दालनात हा कार्यक्रम झाला.

यावेळी प्र. अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी ए. आर. खंडागळे, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, तात्या नवघरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तानाजी घोलप, आकाशवाणीचे वार्ताहर सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेमध्ये राज्य शासनाने गेल्या वर्षभरामध्ये राबविलेल्या योजनांची जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान, पीक कर्ज पुनर्गठन, सावकारी कर्जमाफी, पीक कर्ज वाटप, शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या दरात धान्य वाटप, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ, कौशल्य विकास कार्यक्रम, सौरकृषी पंपांचे वितरण यासह विविध योजनांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे