आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने सोनखास येथे कायदेविषयक जनजागृतीशिबीर संपन्न

                                              


आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने

  सोनखास येथे कायदेविषयक जनजागृती

शिबीर संपन्न

                                                   

वाशिम, दि. 10 (जिमाका) : वाशिम तालुक्यातील सोनखास येथे 8 नोव्हेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश (वरीष्ठ स्तर) पी. पी. देशपांडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.टी. जुमडे, ॲड. शुभम लुंगे, ॲड. जी. व्ही. मोरे यांची उपस्थिती होती.

न्या. देशपांडे यांनी विविध कायद्याबाबत मार्गदर्शन केले. ॲड. जुमडे यांनी निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 या विषयावर,ॲड. लुंगे यांनी मोटार अपघात दावा, तर ॲड. मोरे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड. एन.टी. जुमडे यांनी केले. प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार ॲड. एस. आर. गोरे यांनी मानले. कार्यक्रमाला सोनखास येथील ग्रामसेवक श्री. इढोळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर