जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची गोलवाडी व मंगळसा लसीकरण केंद्राला भेट

*जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची गोलवाडी व मंगळसा लसीकरण केंद्राला भेट*

वाशिम दि.19 (जिमाका) जिल्ह्यात कोविड लसीकरणाने वेग घेतला असून जिल्ह्यात येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात सर्व सुट्टीच्या दिवशीसुद्धा लसीकरण करण्यात येत आहे.आज 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी मंगरूळपीर तालुक्यातील गोलवाडी व मंगळसा लसीकरण केंद्राला भेट दिली.
           गोलवाडी येथील प्राथमिक शाळेत असलेल्या लसीकरण केंद्राला डॉ. आहेर यांनी भेट दिली.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.एस.आर.सुर्वे,शाळेचे केंद्र प्रमुख श्री.कुटे, तलाठी एस.डी. खिल्लारे, आरोग्यसेविका श्रीमती वाडेकर,अंगणवाडी सेविका श्रीमती पोफळकर व आशा कार्यकर्ती श्रीमती शिंदे यांची उपस्थिती होती.    
         गोलवाडीची लोकसंख्या 1628 असून लसीकरणासाठी 1181 व्यक्ती पात्र आहे.आतापर्यंत 893 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. 288 व्यक्तींचे लसीकरण बाकी असल्याची माहिती डॉ.सुर्वे यांनी दिली.गावातील सर्व पात्र व्यक्तींच्या घरोघरी भेट देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण करण्याच्या सूचना डॉ. आहेर यांनी यावेळी दिल्या.
          मंगरुळपीरजवळील मंगळसा येथे देखील डॉ. आहेर यांनी विठ्ठलराव पाकधने यांच्या स्वस्त धान्य दुकानाजवळ सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट दिली. मंगळसाची लोकसंख्या 1113 असून 811 व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहे.त्यापैकी 688 व्यक्तींचे आतापर्यंत लसीकरण झाले असून उर्वरित व्यक्तींच्या घरी भेट देऊन लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पुनम वानखेडे यांनी दिली.यावेळी केंद्रप्रमुख सुदाम भोंडाने व श्री.ठाकरे, मुख्याध्यापक विलास इंगोले,शिक्षक शरद म्हातारमारे,आरोग्य सेवक व्ही.एल.राठोड,आरोग्य सेविका श्रीमती एच.एच.खडसे यांची उपस्थिती होती.कोणताही पात्र व्यक्ती लसीकरणातून सुटू नये,यासाठी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन येण्याच्या सूचना डॉ.आहेर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे