अग्रणी बँक व्यवस्थापक निनावकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

अग्रणी बँक व्यवस्थापक निनावकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

वाशिम,दि.२९ (जिमाका) जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने श्री.निनावकर यांना आज २९ जुलै रोजी सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. 
      यावेळी श्री.निनावकर म्हणाले, अग्रणी बँकेचा व्यवस्थापक म्हणून काम करणे सेवा काळातला वेगळा अनुभव आहे.वेगवेगळ्या ठिकाणी काम केले.गरजु व ग्राहकांच्या कामांना प्राधान्य दिले. 
      यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक म्हणून नव्याने रुजू झालेले दिनेश बारापात्रे,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे,मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत,आरसेटीचे संचालक रघुनाथ माने व विधी अधिकारी श्री.महामुने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व भेट वस्तू देऊन श्री. निनावकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
      यावेळी श्रीमती आंबरे, श्री.कोकडवार,श्री.जुनेद,श्री.उगले, रिंकु देशमुख आदींनी मनोगत व्यक्त करुन श्री.निनावकर यांना शुभेच्छा दिल्या.
      आयोजित कार्यक्रमाला धनंजय कांबळे, नागोराव खोंड, विनोद मारवाडी, विवेक नालट, गोपाल भाग्यवंत,शितल पावडे, सुवर्णा  सुर्वे,शितल उगलमुगले,श्रीमती परदेशी, राजू जाधव,विजय राठोड, अनिल कुरकुटे,गजानन डहाके, नारायण अंभोरे आदी कर्मचाऱ्यांसह इतरही कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शाहू भगत यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे