18 जुलैपासून 45 दिवसाच्या आत हरकती व सूचना मागविल्या



18 जुलैपासून 45 दिवसाच्या आत

हरकती व सूचना मागविल्या

कामगार आयुक्तांचे आवाहन

    वाशिम, दि. 29 (जिमाका) : महाराष्ट्र व्यावसायीक सुरक्षा, आरोग्य व सेवाशर्ती संहिता (कामगार) मसुदा नियम 2021 चा मसुदा शासनाच्या राजपत्रामध्ये 18 जुलै रोजीच्या अधिसुचनेव्दारे प्रसिध्द करण्यात आला आहे. हा मसुदा नियम कामगार विभागाच्या https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर केंद्रीय कायदे व नियम या शिर्षाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. या अधिसूचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्याबाबत 45 दिवसाच्या आत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

         या प्रारुप/मसुद्याबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com या ई-मेलवर स्विकारण्यात येतील. असे सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी कळविले आहे.

                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे