केंद्रीय विद्यालय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न



केंद्रीय विद्यालय येथे

कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

       वाशिम, दि. 20 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने १८ जुलै रोजी केंद्रीय विद्यालय, वाशिम येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, जिल्हा विधीज्ञ संघाचे सहसचिव ॲड. ए.पी. वानरे, प्रमुख वक्ते म्हणून ॲड. डी.पी. अदमने, केंद्रीय विद्यालयाचे प्रभाग मुख्याध्यापक जी. ए. मनवर व महिला व बाल विकास कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी जे. एम. चौधरी यांची उपस्थिती होती.

         यावेळी श्री. टेकवाणी यांनी विद्यालयातील कोविड आजारामुळे ज्या मुला-मुलींचे आई- वडील यांचे मृत्यू झाले अशा दोन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रमुख वक्ते अॅड. डी. पी. अदमने यांनी बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. जे. एम. चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकार, बाल विवाह, बेटी बचाव बेटी पढाओ तसेच बालकांच्या शिक्षणाविषयीच्या अधिकाराबद्दल माहिती दिली.

         सुत्र संचालन व आभार प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बी. के. ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला केंद्रीय विद्यालयातील शिक्षक वर्ग व इयत्ता ८ वी व ९ वीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या परिसरात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय आणि केंद्रीय विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या वतीने शिक्षणापासून वंचित मुला-मुलींचे प्रवेशाबाबत मोहीम राबविली. आजूबाजुच्या परिसरामध्ये जी मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्या अडीअडचणीविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अशा मुला-मुलींचे प्रवेश प्रक्रियासंबंधी असणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यास मदत करेल असे सांगितले.

                                                                                                                                    *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे