अमानी येथील गोडंबी युनिटची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी बचतगटांच्या महिलांशी साधला संवाद
अमानी येथील गोडंबी युनिटची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
बचतगटांच्या
महिलांशी साधला संवाद
वाशिम, दि. २5 (जिमाका) : मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत महिला
आर्थिक विकास मंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव - २ च्या वती
ने सुरू करण्यात
येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील अमानी येथील गोडंबी युनिटची पाहणी जिल्हाधिकारी षण्मुगराजन
एस. यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी भेट देऊन केली. यावेळी मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन
अधिकारी राजेश सोनखासकर, तहसीलदार रवी काळे, अमानीच्या सरपंच रंजना जाधव, लोकसंचालीत
साधन केंद्राचे व्यवस्थापक प्रा. शरद कांबळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत
लोकसंचालित केंद्र मालेगाव-२ च्या माध्यमातून मानव विकास कार्यक्रमांतर्गत गोडंबी ट्रेनिंग
व मार्केटिंगचे युनिट अमानी येथील महिला बचतगटांच्या अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांच्या
माध्यमातून सुरू करण्यात येत आहे. तसा प्रस्ताव मानव विकास मिशनमार्फत मंजूर करण्यात
आला आहे. या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी आज जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी केली.
यावेळी त्यांनी बचतगटाच्या महिलांशी संवाद साधला. किती रुपये दराने आपण बिबे खरेदी
करता आणि त्यामधून गोडंबी काढल्यानंतर प्रति किलो दर किती मिळतो याबाबतची माहिती श्री.
षण्मुगराजन यांनी बचतगटांच्या महिलांकडून घेतली. बिब्यातून गोडंबी काढतांना बिब्यातील तेल अंगावर उडू नये यासाठी हातमोजे घालून
काळजीपूर्वक काम करण्यात यावे असे श्री. षण्मुगराजन यांनी सांगितले.
संपूर्ण माहिती लोकसंचालित साधन केंद्राचे
व्यवस्थापक प्रा. शरद कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी दिली लोकसंचालित साधन
केंद्र मालेगाव-1 मार्फत राबविण्यात येत असलेल्या शेती
अवजारे बँकची सुद्धा पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. यावेळी लता इंगळे,
पुरुषोत्तम हातोलकर, प्रदिप तायडे, सहयोगिनी चंद्रभागा माने, सी.आर.पी. वनिता
अंभोरे उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी यांनी बचतगटाच्या महिलांकडून उभारण्यात येत
असलेल्या गोडंबी युनिटची पाहणी केल्यामुळे महिलांमध्ये चैत्यनाचे वातावरण निर्माण झाले
आहे.
*******
Comments
Post a Comment