मालेगांव येथे क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गतकार्यशाळा संपन्न

मालेगांव येथे क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत

कार्यशाळा संपन्न

            वाशिम, दि. ०3 (जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातंर्गत खाजगी वैद्यकीय व्यावसायीक यांच्या सक्रीय सहभागाबाबतची कार्यशाळा २ फेब्रुवारी २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, मालेगाव येथे संपन्न झाली. कार्यक्रमाला आय. एम. ए. संघटना, मालेगाव, आणि नीमा संघटना, मालेगाव यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळा जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. व्ही. देशपांडे, आय. एम. ए. संघटना, मालेगावचे अध्यक्ष डॉ. विजय सोनुने, नीमा संघटनेचे अध्यक्ष डॉ विवेक माने व  डॉ. उदय चव्हाण केमीस्ट अध्यक्ष मालेगाव श्री. हरीश लाहोटी, डॉ. सतीश परभणकर, डॉ.मिलींद जाधव, श्री.जयकुमार सोनुने, व आय.एम.ए.संघटना,मालेगाव आणि नीमा संघटना, मालेगाव यांचे सदस्य उपस्थित होते.

                 सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते डॉ. राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरवात झाली. यावेळी डॉ. देशपांडे म्हणाले की, खाजगी डॉक्टरांकडे क्षयरुग्णांचे निदानाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांनी खाजगी क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला कळविणे बंधनकारक आहे. तसेच शासकीय-खाजगी वैद्यकीय यंत्रणा, औषधी विक्रेते यांनी जिल्हा क्षयरोग केंद्राशी समन्वय राखावा व प्रत्येक रुग्णावर पुर्ण उपचार होईल याकडे लक्ष दयावे याबाबत मार्गदर्शन केले. सन २०२५ पर्यंत आपल्या देशातुन क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक क्षयरुग्णांचे उपचाराच्या संनियंत्रण करुन उपचार पुर्ण करणे आवश्यक आहे. शासकीय-खाजगी वैद्यकीय यंत्रणा, औषधी विक्रेते यांनी जिल्हा क्षयरोग केंद्राशी समन्वय राखावा व प्रत्येक रुग्णावर पुर्ण उपचार होईल याकडे लक्ष दयावे. नवीन टीबी प्रतीबंधात्मक उपचार पध्दती (पीएमटीपीटी) तसेच मुलांमधील क्षयरोग निदान व उपचार यावर उदाहरणासह सखोल माहिती दिली. डॉ. मिलींद जाधव यांनी क्षयरोग व कुष्ठरोग कार्यक्रमाबाबत माहीती दिली. डॉ. सतीश परभणकर यांनी एम. डी. आर. टीबी निदान व उपचार व त्यामधील गुंतागुंतीबाबत मार्गदर्शन केले. भारतीय दंड संहितेनुसार असलेल्या कलम २६९ व २७० अन्वये क्षयरुग्णांबाबत माहीती न देणाऱ्यास असलेल्या शिक्षेबाबतची माहिती दिली. आय. एम. ए. संघटना मालेगाव यासाठी पुर्ण सहकार्य करेल. असे आश्वासन डॉ. सोनुने यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन श्री. अशोक भगत यांनी तर आभार श्री. साळुके यांनी केले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे