मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यातील अकुशल मजुरांना रोजगार पुरविण्यासाठी विशेष मोहिम

मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यातील

अकुशल मजुरांना रोजगार पुरविण्यासाठी विशेष मोहिम

वाशिम,दि.१८ (जिमाका)- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर विविध स्वरुपाची कामे शेल्फवर उपलब्ध आहे. या कामांवर अकुशल काम करण्यास सक्षम असलेल्या प्रौढ व्यक्तींना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.त्याअनुषंगाने इच्छुक व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच जिल्ह्यातुन कामानिमित्त मजुरांचे होणारे स्थलांतर थांबविणे आणि मजुरांना मागणीनुसार काम तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अकुशल मजुरांना रोजगार पुरविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

        21 फेब्रुवारी 2022 पासुन मग्रारोहयोअंतर्गत ग्रामीण कुटूंबांना काम मागणीचे अर्ज (नमुना क्र.4) तहसिल व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.कामाच्या मागणीचे अर्ज 24 फेब्रुवारी 2022 पासुन तहसिल व पंचायत समिती स्तरावर स्वि‍कारले जाणार आहे. या अर्जाची रितसर पोच (नमुना क्र.5 मध्ये ) संबंधीत कार्यालयाकडुन देण्यात येणार आहे.

       काम मागणी अर्जासोबत बँक पासबुक (आधार लिंक असलेल्या बँक खाते क्रमांकाचे ) व आधार कार्डची छायांकीत प्रत जोडावी.ज्या अकुशल मजुर कुटुंबाकडे जॉबकार्ड उपलब्ध नाही, त्यांनी जॉबकार्डची मागणी तहसिल / पंचायत समिती कार्यालयाकडे तात्काळ करावी.मजुरांचा रोजगार मागणीसाठी अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासुन त्यांना 15 दिवसांचे आत काम न मिळाल्यास महाराष्ट्र रोजगार अधि‍नियम 1977 मधील कलम 8 च्या पोटकलम (4) अन्वये, राज्य शासन निश्चीत करेल अशा दराने व अशा दिवसांकरीता दैनिक बेरोजगार भत्ता अनुज्ञेय राहील.वरीलप्रमाणे नमुद बाबींच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्यास काम मागणी करणाऱ्या प्रत्येक अकुशल काम करण्यास सक्षम असलेल्या प्रौढ व्यक्तींना गावातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.असे रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.

*****

Comments

  1. फक्त तुम्ही सांगता मोहीम बद्दल पण प्रतक्ष्यात मात्र काहीही करत नाही...माझे गाव शेगी तालुका मंगरूळपिर असून आज रोजी गोरगरीब लोकांना कामाची गरज आहे मात्र आज 86 मजुरांनी एक महिना पूर्वी काम मागणी चा रितसर अर्ज करून सुद्धा कामे देण्यात आली नाही . बेरोजगारी भत्ता साठी पण अर्ज केला तरी भत्ता पण नाही आणि काम पण.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे