सवड निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी डिजीटल रथावरुन जाणून घेतली योजनांची माहिती


सवड निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी

डिजीटल रथावरुन जाणून घेतली योजनांची माहिती

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निवडक महत्वपूर्ण योजनांवर जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने दिशा परिवर्तनाची हा यशोगाथा मांडणारा माहितीपट आणि 8 ऑडीओ-व्हिडीओ जिंगल्स तयार केले आहे. जिल्हयात डिजीटल रथाच्या माध्यमातून हा माहितीपट आणि ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स जिल्हयातील विविध गावात, शाळा, महाविद्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी दाखविण्यात येत आहे. नुकतेच रिसोड तालुक्यातील सवड येथील समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी डिजीटल रथावरुन समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती हा माहितीपट आणि ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स बघून जाणून घेतली.

          उपस्थित निवासी शाळा आणि वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई घरकुल योजना, मुला-मुलींसाठी वसतीगृहे योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास यासह अन्य योजनांवर आधारीत जिल्हयातील यशोगाथा दिशा परिवर्तनाची या माहितीपटातून जाणून घेतल्या.

          तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा, दुभत्या जनावरांचे गट वाटप, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आणि बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे या 8 योजनांवर आधारीत ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स बघितले. निवासी शाळा व वसतीगृहातील विद्यार्थ्यांची यावेळी मोठया संख्येने उपस्थिती होती. निवासी शाळेचे मुख्याध्यापक देवानंद धवसे, शिक्षक एस.एस. पायघन, ए.एच. पाचारे, बी.डी. कटके, एन.ए. सरनाईक, श्रीमती. एन.आर. गाडे, श्रीमती पि.व्ही. तुरुकमाने, पी.एस. कळासरे, सहाय्यक ग्रंथपाल एन.आर. भिसे व कनिष्ठ लिपीक एस.डी. डोंगरे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

*******


Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित