कारंजा येथे डिजीटल रथाचा शुभारंभ



कारंजा येथे डिजीटल रथाचा शुभारंभ

       वाशिम, दि. 09 (जिमाका) : कारंजा पंचायत समिती येथे 8 फेब्रुवारी रोजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माधवराव साखरे व प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या हस्ते डिजीटल चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या डिजीटल रथामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती संबंधित घटकातील लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 अंतर्गत ‘दिशा परिवर्तनाची’ हा माहितीपट आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा, मार्जिन मनी योजना, शेळी गट वाटप योजना व कन्यादान योजना या योजनांवर आधारित ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स कारंजा शहर व ग्रामीण भागात दाखविण्यात येणार आहे. डिजीटल रथाच्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर.एस. भगत, सहाय्यक प्रशासन अधिकारी अपर्णा जाधव, कनिष्ठ सहाय्यक विलास कोकरे, सागर गावंडे, प्रशांत राऊत, महेश उघडे, नरेश कडू, संगीता राजगुरु, विजया पारडकर, रजनी चारथळ, मोनाली दाभाडे, लता ठाकरे, स्वप्ना नाचोने व ज्योती लोपनार यांची उपस्थिती होती.

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर