प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजना फेरीवाल्यांसाठी 23 फेब्रुवारी रोजीला शिबीर



प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजना

फेरीवाल्यांसाठी 23 फेब्रुवारी रोजीला शिबीर

       वाशिम, दि. 20 (जिमाका) : वाशिम शहरातील सर्व फेरीवाल्यांकरीता वित्तीय समावेशन ते सशक्तीकरण अंतर्गत नगर परिषद, वाशीमच्या वतीने कर्ज मेळावा शिबिर आयोजित केले आहे. शहरातील फेरीवाल्यांचे मोबाईल ॲपव्दारे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नगर परिषद वाशीम अंतर्गत शहर उपजीविका केंद्र, युनियन बँकेच्या मागे, बालाजी संकुल, वरचा मजला, पाटणी चौक, वाशीम येथे सर्व बँक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

         फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याकरीता सुविधा आहे. पात्र फेरीवाले यांनी आपले कागदपत्रे घेऊन ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा. या शिबिराच्या दिवशी बँक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत कर्ज मंजूर होणार आहे. तरी यापूर्वी बँकेत अर्ज केलेला असल्यास अर्ज बँकेकडे प्रलंबित असल्यास अर्ज केलेल्या अर्जाची एक प्रत शिबिराच्या दिवशी घेऊन यावी. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा कर्ज मंजूर योजनेचा लाभ घेण्यात यावा. तसेच ज्या लाभार्थ्यांचे कर्ज वाटप झाले आहे, त्यांना क्युआर कोडच्या माध्यमातून डिजिटल साधनाच्या माध्यमातून व्यवहार करता यावे. याकरीता फोन पे कंपनीच्या वतीने क्युआर कोडचे वाटप होणार आहे. परिचय बोर्डसुद्धा वाटप करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी लाभ घ्यावा.

          ज्या लाभार्थ्यांनी मागील वर्षी १० हजार रुपयाचा कर्ज योजनेचा लाभ घेऊन सुरळीत परतफेड केली आहे, त्यांनी पहिले कर्ज परतफेड केल्याचा दाखला घेऊन २० हजार रुपये कर्ज योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यात यावा. ज्यांनी अर्ज भरला असेल तो बँकेकडे प्रलंबित असल्यास सोबत घेऊन यावे. बँक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत अर्ज निकाली काढता येईल. नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी आधार संलग्न मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, फेरीव्यवसाय फोटो, नगर पालिकेची बैठक पावती व सर्व्हेक्षण झाल्याची पोच पावती आदी कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा. असे आवाहन वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश