मंगरुळपीर येथे 28 पानटपरींवर धडक कारवाई
- Get link
- X
- Other Apps
मंगरुळपीर येथे 28 पानटपरींवर धडक कारवाई
वाशिम, दि. 24 (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आज 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर आणि पोलीस स्टेशन, मंगरुळपीर यांच्या संयुक्त वतीने कोटपा 2003 च्या कायद्याअंतर्गत 28 पानटपरीधारकांवर कलम 6 (अ) व 6 (ब) अंतर्गत दंडात्मक कारवाई करुन 5 हजार 600 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. यावेळी मंगरुळपीर येथील अकोला चौक, मानोरा चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते राम धाडवे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. चिस्तळकर, अविनाश कुकडे, महेश बारगडे, लोकेश राठोड, पुनर्वसन कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर येथील कर्मचाऱ्यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment