कृषि विभागाच्या शिपाई, चौकीदार भरतीसाठी जमा केलेले परीक्षा शुल्क परत मिळणार
·
दि. ३१ मे पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे
आवाहन
वाशिम, दि. २६ : अमरावती विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयाने शिपाई, चौकीदार
पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने घेण्याकरिता दि. २४ डिसेंबर २०१३ रोजी जाहिरात
दिली होती. ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून ज्या उमेदवारांनी या पदांसाठी
आवेदन पत्र सादर केले व त्याबरोबर परीक्षा शुल्क डीडीद्वारे जिल्हा अधीक्षक कृषि
कार्यालयास जमा केले होते, त्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क संबंधितांना परत केले
जाणार आहे. याकरिता संबंधित उमेदवारांनी रक्कम भरल्याची पावती व फॉर्म, उमेदवाराचा
बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड, उमेदवाराचे ओळखपत्र व बँक पासबुकची
पहिल्या पानाची सुस्पष्ट छायांकित प्रत दि. ३१ मे २०१८ पर्यंत वाशिम जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावी. वरील माहिती व कागदपत्रे विहित
कालावधीत जमा न केल्यास परीक्षा शुल्काची रक्कम मिळणार नाही, असे जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment