मुलींचा जन्मदर वाढीसाठी व तिच्या जन्माच्या स्वागतासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबवा -जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान जिल्हास्तरीय कृती समितीची सभा

 



मुलींचा जन्मदर वाढीसाठी व तिच्या जन्माच्या

स्वागतासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबवा

                                                                    -जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.

बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान

जिल्हास्तरीय कृती समितीची सभा

 

वाशिम, दि. 14 (जिमाका) :  जिल्ह्यात वाशिम कारंजा व रिसोड तालुक्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. मुलींच्या लिंग गुणोत्तरात वाढ होण्यासाठी आशा, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या नियमित सभा घेण्यात याव्यात. स्त्रीभ्रुण हत्या व गर्भलिंग निदान चाचणी यासारखे प्रकार जिल्ह्यात होणार नाही याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी आणि तिच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले.

आज 14 डिसेंबर रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत जिल्हास्तरीय समितीची सभा श्री. षन्मुगराजन एस. याच्या अध्यक्षतेखाली वाकाटाक सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला समितीच्या सदस्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) श्री. संजय जोल्हे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमेश तांगडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, स्वयंसेवी संस्थेच्या श्रीमती सोनाली ठाकुर, जिल्हा सल्लागार (युनिसेफ) डॉ. कुकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) श्रीमती एम. डी. भस्मे, जिल्हा औषधी निर्माण असोशिएशनचे अध्यक्ष श्री. पाटील व जिल्हा अन्न व औषधी निरीक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री. षन्मुगराजन  म्हणाले, जागतिक महिला दिनी ज्या गावांमध्ये मुलींच्या जन्मदराचे प्रमाण जास्त आहे, त्या ग्रामपंचायतीला प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात यावे. ज्या गावी मुलगी जन्माला येते, त्या गावी मुलीच्या नावाने एक वृक्ष लावण्यात यावा. जिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी पात्र असलेल्या कुटूंबाचा शोध घेऊन व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रत्यक्ष त्या कुटूंबाला भेट द्यावी. त्या कुटूंबाना या योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात यावी. सुकन्या समृध्दी योजनेचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करण्यात यावा. मुलींसाठी असलेल्या विविध योजनांचे एक पॉम्प्लेट तयार करुन पालकांना त्याचे वाटप करावे. असे त्यांनी सांगितले.

डिसेंबर 2021 पर्यंत माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे सागून श्री. षन्मुगराजन म्हणाले, एक आणि दोन मुलींच्या पात्र पालकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात यावी. प्रत्येक अंगणवाडीमध्ये मुलींसाठी असलेल्या योजनांची माहिती दर्शनी भागात लावण्यात यावी. शुन्य ते सहा वर्षापर्यंत मुलींची विशेष काळजी घेण्यात यावी. अंगणवाडीत त्यांच्या आहार, आरोग्य व वाढीकडे विशेष लक्ष द्यावे. दर महिन्याला अंगणवाडी सेविकांची नियमित मिटींग बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी घ्यावी. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्याचे मुल्यमापन करणारा मासिक अहवाल तयार करण्यात यावा. असे ते म्हणाले.

श्री. षन्मुगराजन पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ज्या मुलींनी क्रीडा, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात व लोकप्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यांना समितीच्या सभेमध्ये बोलावून सन्मानीत करावे. त्यामुळे त्यांची प्रेरणा अनेकांना घेता येईल. शाळाबाहय मुलींचा शोध घेवून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणावे. जिल्हयात मुलींचे बालविवाह होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. असे त्यांनी सांगितले.

श्रीमती पंत म्हणाल्या, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. पोस्टाच्या सुकन्या समृध्दी योजनेची माहिती मुलींच्या पालकांना देण्यात यावी. तीव्र कुपोषित व अतितीव्र कुपोषीत बालकांचा व्यवस्थित तुलनात्मक तक्ता तयार करण्यात यावा. असे त्या म्हणाल्या.

श्री. जोल्हे यांनी लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे व मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे हे बेटी बचाओ-बेटी पढाओ हे या अभियानाची उद्दिष्टे असल्याचे सांगितले. जिल्हयात सन 2017-18 या वर्षात 953, सन 2018-19 मध्ये 931, सन 2019-20 या वर्षात 920, सन 2020-21 या वर्षात 945 आणि सन 2021-22 या वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हयातील मुलींचा जन्मदर 917 असल्याचे श्री. जोल्हे यांनी सांगितले. एप्रिल ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत कारंजा तालुका- 868, मालेगांव तालुका- 1065, मंगरुळपीर तालुका- 1079, मानोरा तालुका- 1108, रिसोड तालुका- 933, वाशिम तालुका- 886 अशा प्रकारे मुलींचा जन्मदर आहे.

जिल्हयात एकूण 493 ग्रामपंचायती असून त्यापैकी 255 ग्रामपंचायतीमध्ये एक हजारपेक्षा जास्त मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील 41, रिसोड तालुक्यातील 43, मालेगांव तालुक्यातील 39, मंगरुळपीर तालुक्यातील 35, कारंजा तालुक्यातील 57 आणि मानोरा तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्हयात 1207 मुलींचा जन्म झाला. मुलीच्या जन्माचे स्वागत करुन 1086 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती श्री. जोल्हे यांनी दिली. सभेला तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री. जोल्हे यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश