एचडीएफसी बँकेच्या सीएसआर फंडातून जिल्हा सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे भेट
एचडीएफसी बँकेच्या सीएसआर फंडातून
जिल्हा सामान्य
रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे भेट
वाशिम, दि.
31 (जिमाका) : एचडीएफसी बँकेने त्यांच्या सामाजिक
उतरदायीत्व निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड मदत कार्यक्रमांतर्गत ही वैद्यकीय
उपकरणे भेट देण्यात आली. यानिमित्ताने आज 31 डिसेंबर रोजी वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात
जिल्हाधिकारी, षण्मुगराजन एस., प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर, जिल्हा
नियोजन अधिकारी सुनिता आमरे, एचडीएफसी बँकेचे क्लस्टर हेड संदेश काबरा, वाशिम येथील
एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. खेळकर
यांना रुग्णांसाठी लागणारी आवश्यक उपकरणे हस्तांतरीत करण्यात आली.
एचडीएफसी बँकेने त्यांच्या सामाजिक उतरदायीत्व योजनेतून जिल्हा सामान्य रुग्णालयाला
15 पॅरा मॉनिटर, 3 ईसीजी मशिन व 5 डेफिरीलेब्यूटर या वैद्यकीय उपकरणाची भेट देण्यात
आली.
याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
शंकर तोटावार, बँकेचे गर्व्हमेंट बिजनेस धनंजय पेनुरकर, एचडीएफसी बँकेतील कर्मचारी
सर्वश्री गणेश शक्करवार, अभिजीत देशमुख, नंदकिशोर अनसिंगकर, वैभव अनसिंगकर, अलोक देवगिरकर,
रामेश्वर सावंत यांची उपस्थिती होती.
*******
Comments
Post a Comment