आज 5 हजार 121 व्यक्तींचे लसीकरण

आज 5 हजार 121 व्यक्तींचे लसीकरण

वाशिम दि.9 (जिमाका) जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 9 डिसेंबर रोजी 5 हजार 121 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 2 हजार 125 व्यक्तींनी व दुसरा डोस 2 हजार 996 व्यक्तींनी घेतला.

   वाशिम तालुका : पहिला डोस - 487 व दुसरा डोस -911 असा एकूण 1398, मालेगाव तालुका : पहिला डोस - 578 आणि दुसरा डोस - 503 एकूण 1081, रिसोड तालुका : पहिला डोस - 160 व दुसरा डोस -165 एकूण 325, कारंजा तालुका : पहिला डोस - 449 आणि दुसरा डोस -635 एकूण 1084, मानोरा तालुका : पहिला डोस - 265 व दुसरा डोस 379 एकूण 644 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस - 186 आणि दुसरा डोस - 403 असा एकूण 589 व्यक्तींना देण्यात आला.


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश