*नगरपंचायत व ग्रामपंचायत पोटनिवडणूक २०२१* *निवडणूक क्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश
*नगरपंचायत व ग्रामपंचायत पोटनिवडणूक २०२१*
*निवडणूक क्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश*
वाशिम,दि. १८ (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने नगर पंचायत, मानोरा व ग्रामपंचायत पोटनिवडणुक -२०२१ चा कार्यक्रम जाहीर केलेला असून जिल्हयातील नगर पंचायत, मानोरा व ग्रामपंचायत पोटनिवडणुक अनुषंगाने २१ डिसेंबर रोजी मतदान व २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.
नगर पंचायत, मानोरा व ग्रामपंचायत पोटनिवडणुक दरम्यान मतदान व मतमोजणीचे रोजी लोक राजकीय कारणावरुन भांडण तंटे करतात व त्याचे रुपांतर मोठया भांडणात किंवा घटनेत रुपांतर होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते.या सर्व बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी व निवडणुक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याचे उद्देशाने
निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातुन निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता संबंधित निवडणुक क्षेत्रात २० डिसेंबर २०२१ रोजीचे सकाळी ६.०० वाजतापासून ते २१ डिसेंबर २०२१ रोजीचे सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत तसेच मतमोजणीचे दिवशी २२ डिसेंबर २०२१ रोजीचे सकाळी ६ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागु करण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षन्मुगराजन एस.यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment