कोरोना पार्श्वभूमिवर निर्बंधाबाबतचे सुधारीत आदेश जारी • लग्न समारंभ उपस्थितीला 50 लोकांची मर्यादा • अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी • कलम 144 नुसार जमावबंदी
कोरोना पार्श्वभूमिवर निर्बंधाबाबतचे सुधारीत आदेश जारी
• लग्न समारंभ उपस्थितीला 50 लोकांची
मर्यादा
• अंत्यविधीसाठी
20 लोकांना परवानगी
• कलम 144 नुसार जमावबंदी
वाशिम दि.31
(जिमाका) : आगामी काळात येणारे लग्न समारंभ व इतर सण आणि नववर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमिवर
पुढील काही दिवसात राज्यात कोविड रुग्ण संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत
नाही. यापूर्वी निर्गमित आदेशाव्दारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लादलेल्या
निर्बंधाव्यतिरिक्त आणखी काही निर्बंध लादणे अत्यावश्यक असल्याचे 30 डिसेंबर 2021 च्या
शासन निर्णयात नमूद केले आहे. त्या अनुषंगाने निर्बंधाबाबतचे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी
तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस.यांनी जारी केले
आहे.
जिल्हयात 30 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण व शहरी भागाकरीता यापूर्वी लादण्यात
आलेल्या निर्बंधामध्ये बदल करुन सुधारीत निर्बंधाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी, वाशिम यांनी
निर्गमित केले आहे. लग्न समारंभाच्या बाबतीत उपस्थितांची एकूण संख्या 50 लोकांची राहील.
ही संख्या बंदिस्त सभागृह व मोकळ्या मैदानालासुध्दा लागू राहील.सर्व प्रकारचे सांस्कृतिक,
राजकीय, धार्मिक कार्यक्रमासाठी मग ते बंदिस्त सभागृह किंवा रिकाम्या जागेत असतील अशा
सर्व कार्यक्रमांना 50 लोकांना उपस्थितीची परवानगी राहील. अंत्यविधीसाठी 20 लोकांना
उपस्थितीची परवानगी राहील. जिल्हयातील पर्यटन स्थळे, रिकामे मैदाने व इतर सर्व सार्वजनिक
ठिकाणी फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात येत आहे.
यापूर्वी निर्गमीत केलेले निर्बंध कायम राहतील.
वरील मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहितेच्या तरतूदीनुसार
शिक्षेस पात्र राहील.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष षण्मुगराजन
एस. यांनी या आदेशात नमुद केले आहे.
*******
Comments
Post a Comment