जिल्हयात जलशक्ती अभियान राबविणार
जिल्हयात
जलशक्ती अभियान राबविणार
वाशिम, दि. 10
(जिमाका) : पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरच्या बांधकामाव्दारे
आणि दूरुस्तीव्दारे पाण्याचा साठा वाढविणे, अस्तीत्वातील तलावांचे, जलस्त्रोतांचे
पुनज्जीवन करणे, पावसाळयापूर्वी नदयांचे पुनज्जीवन करणे, सर्व पाणी साठवण
बांधकामांची/ योजनांची जीओटॅगींगसह प्रगणना करणे, जलसंधारण आणि जलसंधारण
संरचनासाठी वैज्ञानिक योजना करणे आणि जलशक्ती केंद्राची स्थापना करणे आदी
उद्दिष्टांवर आधारीत जलशक्ती अभियान जिल्हयात राबविण्यात येणार आहे.
वरील सर्व प्रकारच्या माहितीच्या आधारे वैज्ञानिक जिल्हास्तरीय जलसंधारण
योजना तयार करण्याचे नियोजन या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. जलशक्ती
अभियानांतर्गत जिल्हास्तरावर जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची जिल्हा नोडल अधिकारी
म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानांतर्गतच्या जिल्हयातील मोहिमेसाठी
केंद्र प्रमुख म्हणून वाशिम उपविभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. व्ही.
बी. सपकाळ (7972604873) आणि उपकेंद्र प्रमुख म्हणून तांत्रिक सहायक एम.ए. हुमने
(9175502064) हे काम पाहणार आहे.
*******
Comments
Post a Comment