खडकी (इजारा) येथे पशुंचे लसीकरण व तपासणी
खडकी (इजारा) येथे
पशुंचे लसीकरण व
तपासणी
वाशिम दि.28 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्ताने मालेगांव पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या खडकी
(इजारा) येथे पाळीव जनाव
रांची तोंडखुरी, पायखुरी, लसीकरण तसेच गर्भ तपासणी,
खच्चीकरण व इतर वेळेवरील उपचार करण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन
पर्यवेक्षिका डॉ. सुनिता सोळंके, पट्टीबंधक विद्यानंद कांबळे, सहाय्यक काशिनाथ
गव्हाणे व सुमित इंगळे उपस्थित होते. ही तपासणी व लसीकरण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.
ज्ञानेश्वर देखमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी सरंपच श्रीमती
पंचफुला मैंदकर, उपसरपंच गंगुबाई कालापाड, पोलीस पाटील गजानन धनगर, ग्रामपंचायत
सदस्य विठ्ठल बोरकुटे यांच्यासह गावातील शेतकरी श्री. गजानन गायकवाड, नितेश मैंदकर,
बबन कालापाड, किसन धनगर, छोटू इंढोळे, गजानन टाले यांची उपस्थिती होती. यावेळी
उपस्थितांना पशुधन विभागाच्या योजनांची माहिती तसेच लसीकरणाची माहिती देण्यात आली.
*******
Comments
Post a Comment