*आज 4 हजार 682 व्यक्तींचे लसीकरण*

*आज 4 हजार 682 व्यक्तींचे लसीकरण*

 वाशिम दि.24 (जिमाका) जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 24 डिसेंबर रोजी 4 हजार 682 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 481 व्यक्तींनी व दुसरा डोस 4 हजार 201 व्यक्तींनी घेतला.
   वाशिम तालुका : पहिला डोस - 131 व दुसरा डोस -922 असा एकूण 1053, मालेगाव तालुका : पहिला डोस - 81 आणि दुसरा डोस - 600 एकूण 681, रिसोड तालुका : पहिला डोस -61 व दुसरा डोस - 692 एकूण 753, कारंजा तालुका : पहिला डोस - 107 आणि दुसरा डोस -1012 एकूण 1119,मानोरा तालुका : पहिला डोस - 51 व दुसरा डोस 479 एकूण 530 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस - 50 आणि दुसरा डोस - 496 असा एकूण 546 व्यक्तींना देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश