पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भिंतीपत्रक आणि घडिपुस्तिकेचे विमोचन



वाशिम, दि. २९ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज २९ जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या प्रारंभी नियोजन भवन येथे जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ या वर्षातील निधीतून तयार केलेले भिंतीपत्रक आणि राज्य सरकारच्या चार वर्षातील महत्वपूर्ण योजनांची माहिती देणाऱ्या ‘प्रतिबिंब विकासाचे..’ या घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनांची माहिती व्हावी यासाठी हे भिंतीपत्रक तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारने चार वर्षात जिल्ह्यात राबविलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती देणारी घडीपुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केली आहे. या योजनांमध्ये जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या उपायायोजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, सर्वांसाठी घरे, जलयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, सौर कृषीपंपाचे शेतीला पाठबळ, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, महात्मा फुले जन आयोग्य योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, सिंचन विहीरीचा कार्यक्रम, पॉस मशिनव्दारे धान्याचे वितरण, कृषी पंपांना वीज जोडणी या योजनांचा समावेश असून याबाबतची माहिती या घडीपुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित