रविवारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा



·         जिल्ह्यातून २०८८ परीक्षार्थी
·         ६ उपकेंद्रांवर होणार परीक्षा
वाशिम, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०१९  रविवार, १६ जून २०१९ रोजी वाशिम शहरातील सहा परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १० वा. ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून २०८८ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.
वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, एसएमसी इंग्लिश स्कूल, श्री बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा व जवाहर नवोदय विद्यालय या सहा उपकेंद्रांवर ही परीक्षा होत आहे.
उमेदवारांनी परीक्षेसाठी प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. परीक्षेस येताना प्रवेशपत्रासोबतच स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना (फक्त स्मार्टकार्ड प्रकारचा) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारास प्रवेश नाकारला जाईल. प्रवेश प्रमाणपत्र व वर नमूद पाच वैध ओळखपात्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
आधारकार्ड ऐजवी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधारवर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्म तारीख या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह कलर प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रो फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सीम कार्ड, ब्ल्यू टूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोट्स, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, पॅड, पाऊच, परिगणक इत्यादी प्रकारची साधने, साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. आयोगाने परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन, साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन, साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आयोग, जिल्हा प्रशासन किंवा शाळा महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार राहणार आहेत.
फक्त पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीच्या पुराव्यासाठी वैध मूळ ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रातील सुचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. अर्जात हेतूपुरस्पर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आयोगास सादर केलेल्या पुरावा, कागदपत्रामध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा केलेले वा बनावट पुरावा, दाखले सादर करणे, आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन, परीक्षेच्या वेळी नक्कल करणे, वशिला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाच्या बाहेर अथवा परीक्षेनंतरही तसेच अन्य कोणतेही गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना वा निवडींना अनर्ह ठरविणे, काळ्या यादीत समाविष्ट करणे व प्रतिरोधित करण्यात यापैकी प्रकरण परत्वे आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार योग्य त्या शिक्षेला संबंधित व्यक्ती पात्र ठरेल. तसेच प्रचलित कायदा व नियमांच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश