वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर



वाशिम, दि. १३ : जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत आज, १३ जानेवारी रोजी काढण्यात आली. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे आहे –
१.     वाशिम – अनुसूचित जाती महिला
२.     मानोरा – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
३.     मालेगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग
४.     मंगरूळपीर – सर्वसाधारण
५.     कारंजा लाड – सर्वसाधारण महिला
६.     रिसोड – सर्वसाधारण महिला
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे