रिसोड सिव्हील लाईन परिसरातील रस्ता मतमोजणी काळात राहणार बंद


वाशिम, दि. ०७ :  जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ८ जानेवारी २०२० रोजी होत आहे. रिसोड तालुक्यातील मतमोजणी रिसोड येथील उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्याल येथे होईल.  याकरिता सिव्हील लाईन रोडवरील शासकीय धान्य गोदाम ते त्रिमूर्ती किराणा पर्यंत लोखंडी बॅरेकेटिंग व गीता फर्निचर ते चैतन्य मेडिकल पर्यंत बॅरेकेटिंग करण्यासाठी परवनगी देण्यात आली आहे. त्यामुळे रिसोड शहरातील सिव्हील लाईन रोडवरील शासकीय धान्य गोदाम ते त्रिमूर्ती किराणापर्यंतचा रस्ता व गीता फर्निचर ते चैतन्य मेडिकलपर्यंतचा रस्ता ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७ वाजता ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतुकीस, रहदारीस बंद करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे