जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
·
१७
जानेवारीपर्यंत प्रस्ताव स्वीकारणार
वाशिम, दि. ०९ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत वाशिमजिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत १६ ऑक्टोंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा
पुरस्कार प्रजासत्ताक दिनी वितरीत करण्यात येणार आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील
गुणवंत खेळाडू ३ (पुरुष-१, महिला-१, दिव्यांग-१), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व
गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक असे एकूण पाच पुरस्कार देण्यात येतात.स्मृतीचिन्ह,
प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१९-२० कारीताच्या पुरस्कारांसाठी
शासन निर्णयानुसार आवश्यक कागदपत्रांसह १७ जानेवारी २०२० पर्यंत प्रस्ताव बंद
लिफाफ्यात सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करताना प्रस्तावातील
कागदपत्रावर व प्रमाणपत्रावर पृष्ठ क्रमांक नमूद करावा. शासन निर्णयानुसार आवश्यक
कागदपत्रे जोडून ती स्वसाक्षांकित करावीत. उशिरा प्राप्त होणारे प्रस्ताव
कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्याकरीता जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.
१ जुलै ते ३० जून या कालावधीतील क्रीडा विषयक
कामगिरीवर आधारित हे पुरस्कार असून क्रीडा संघटक पुरस्कारासाठी विकासात्मक कार्य,
संघटनात्मक कार्य, क्रीडा प्रचार व प्रसार इत्यादी बाबींचा समावेश आहे. यामध्ये
भरीव कार्य केलेल्या ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी या
पुरस्कारासाठी अर्ज करावेत.
गेल्या दहा वर्षात मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत
खेळामध्ये किमान वरिष्ठ गटातील राज्य, राष्ट्रीय विजेते तसेच नॅशनल गेम्समध्ये
घडविणारे खेळाडू मार्गदर्शकाने असल्यास अशा मार्गदर्शकास क्रीडा मार्गदर्शक
पुरस्कारासाठी अर्ज करता येईल. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मागील पाच वर्षातील
उत्कृष्ठ ठरणाऱ्या तीन वर्षाची कामगिरी लक्षात घेण्यात येईल. यामध्ये
मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स,
ज्युनियर एशियन इत्यादी बाबींचा समावेश आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी
कळविले आहे.
Comments
Post a Comment