वाशिम शहरात २६ जानेवारीपासून शिवभोजन


·        पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार शुभारंभ
वाशिम, दि. २३ : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिवभोजन योजनेचा रविवार, २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. या योजनेंतर्गत शहरात दोन ठिकाणी १० रुपयात भोजन मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने रोज २२५ थाळीचे नियोजन केले आहे.
भोजनालय चालविण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय अथवा मेस यापैकी योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची जिल्हानिहाय निवड करण्यात आली आहे. शिवभोजनासाठी प्रत्येक थाळीला ग्राहकाकडून १० रुपये घेतले जातील. प्रत्येक थाळीला राज्य शासनाकडून ४० रुपये अनुदान दिले जाईल. भोजनालयातील दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
वाशिम शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर व कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरात रेल्वे स्थानक रोडवर या योजनेतून शिवभोजन मिळणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत शिवभोजन उपलब्ध असणार आहे. ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना भोजनालयात सवलतीच्या दरात जेवण्यास सक्त मनाई आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे