तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत १० जणांवर दंडात्मक कारवाई
वाशिम, दि. १६ : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व
तंबाखू बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तंबाखू विरोधी अभियानाच्या
पथकाने केलेल्या या कारवाईत १५०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पुसद नाका, हिंगोली
नाका परिसरात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे
निदर्शनास आल्याने तंबाखू विरोधी अभियानाच्या पथकाने तंबाखू नियंत्रण कायद्याच्या
कलम ४ व कलम ६ नुसार १० जणांवर दंडात्मक कारवाई केली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे डॉ. आदित्य पांढारकर, राम सरकटे, रामकृष्ण
धाडवे व पोलीस विभागातर्फे स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष कंकाळ, मुकेश भगत, राजेश
गिरी, निलेश इंगळे व प्रेमदास आडे यांचा या पथकात सहभाग होता.
Comments
Post a Comment